अधिक मास अधिक पुण्य...

१. अधिक मास अधिक पुण्य देणारा महिना आहे. अथर्ववेदात या मासाला भगवान महाविष्णूंचे घर म्हटले आहे. 'त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।'

२. भगवान महाविष्णू या अधिक मासाचे अधिपती आहेत. अधिक मासाची कथा कृष्णावतार व नृसिंहअवतार यांच्याशी निगडित आहे. म्हणून या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नृसिंह यांचीही पूजा केली जाते. 

.३) या महिन्यात भगवद्गीता, श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा, नृसिंह कथा यांचे पारायण केले जाते. त्या दृष्टीने ही उपासना अधिक फलदायी मानली जाते. जी व्यक्ती या महिन्यात व्रत, उपासना करते, ती सर्व पापांतून मुक्त होते, व मरणोत्तर तिला वैकुंठप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. 

४. या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता, कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते. 

५. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने जप, तप, साधन करून भगवान नृसिंहाना प्रसन्न करून घेतले, त्याप्रमाणे भाविकांनी आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी काया, वाचा, मनाने भगवंताची उपासना केली असता, त्यांनाही भगवद्प्राप्ती होते.

६. या महिन्यात भगवान महाविष्णूंच्या ३३ अवतारांची पूजा केली जाते - विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरि, कृष्ण, भधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपु, अनिरुद्ध, त्रीविक्रम, वासुदेव, यगत्योनि, अनंत, विश्वाक्षिभूषण, शेषशायिन, संकर्षण, प्रदुम्न, दैत्यारि, विश्वतोमुख, जनार्दन, धारावास, दामोदर, मघार्दन, श्रीपती

७. या महिन्यात देवघरात शाळीग्राम असल्यास त्याच्या बाजूला अखंड दीप तेवत ठेवला जातो. 

८. पुरुषोत्तम मासानिमित्त भगवद्गीतेचे पठण लाभदायी ठरते, विशेषत: चौदावा अध्याय म्हटला पाहिजे. 

९. `ऊँ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. 

१०. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचेही पठण करता येईल. 

११. अधिक महिन्यात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. त्यानिमित्त दीपदान, ध्वजदान किंवा अन्नदानही केले जाते. 

१२. हिंदू धर्मात गोमातेला खूप महत्त्व आहे. म्हणून शक्य तेव्हा, गायीला ताजा आणि हिरवा चारा द्यावा.

१३. या मासात एकभूक्त राहून, आपल्या वाटणीचे एकवेळचे जेवण किंवा कोरडे धान्य दान द्यावे. गहू, तांदूळ, डाळ, कणिक, मीठ, मोहरी, जिरे, दूध, दही, आवळे, पान-सुपारी इ.

Comments

Popular posts from this blog

मी कोणाला कळलो नाही...

नावडे जें चित्ता...

कहना तो बहुत कुछ है.....💔😢