अधिक मास अधिक पुण्य...
१. अधिक मास अधिक पुण्य देणारा महिना आहे. अथर्ववेदात या मासाला भगवान महाविष्णूंचे घर म्हटले आहे. 'त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।' २. भगवान महाविष्णू या अधिक मासाचे अधिपती आहेत. अधिक मासाची कथा कृष्णावतार व नृसिंहअवतार यांच्याशी निगडित आहे. म्हणून या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नृसिंह यांचीही पूजा केली जाते.  .३) या महिन्यात भगवद्गीता, श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा, नृसिंह कथा यांचे पारायण केले जाते. त्या दृष्टीने ही उपासना अधिक फलदायी मानली जाते. जी व्यक्ती या महिन्यात व्रत, उपासना करते, ती सर्व पापांतून मुक्त होते, व मरणोत्तर तिला वैकुंठप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.  ४. या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता, कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते.  ५. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने जप, तप, साधन करून भगवान नृसिंहाना प्रसन्न करून घेतले, त्याप्रमाणे भाविकांनी आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी काया, वाचा, मनाने भगवंताची उपासना केली असता, त्यांनाही भगवद्प्राप्ती होते. ६. या महिन्यात भगवान महाविष्णूंच्या ३३ अवतारांची पूजा...