आयुष्य म्हणजे काय???

आयुष्य म्हणजे काय ????
.
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव
'' नसतं पण " श्वास '' असतो
आणि ....
.
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त
"नांव'' असतं पण श्वास नसतो.
" नाव '' आणि " " श्वास "
यांच्या मधिल अंतर म्हणजेच "
आयुष्य...

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि, "आपण" कोण
आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि, "आपले"
कोण आहेत.

"आयुष्य छान आहे"... "थोडे लहान आहे "... परंतु             
लढण्यात शान आहे.

जग एक सापशिडीचा खेळ आहे. इथं
शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त
आहेत.

चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात.

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले
आईवडील. त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही.

वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर, आयुष्य बदलते प्रेम
झाल्यावर, प्रेम नाही बदलत
आपल्या लोकांबरोबर. पण आपली लोकं मात्र
बदलतात वेळ आल्यावर.

"चांगली वस्तू", "चांगली माणसे", "चांगले
दिवस" आले की माणसाने "जुने दिवस" विसरू नयेत.

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात. कारण
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते. पण
अश्रूला बाहेर
येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागतं.

"५ सेकंदाच्या छोट्याशा स्माइलने जर
आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर
"नेहमी" स्माइल दिल्यावर आपले आयुष्य
किती सुंदर दिसेल".

जिच्या उदरात जन्म
होतो ती माता, आणि जिच्या उदरात अस्त
होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक
म्हणजे माणसाचे जीवन.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा,
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत
नाही.

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं
सोनं होतं.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून
तुमची श्रीमंती कळते.

  चॉकलेट ची गोडी जीभेवर काही सेकंदच राहते. पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत
हृदयात घर करून राहते

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत.

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचे नसून
त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं.

Comments

Popular posts from this blog

मी कोणाला कळलो नाही...

नावडे जें चित्ता...

कहना तो बहुत कुछ है.....💔😢