Posts

Showing posts from September, 2023

वाघनख....

Image
 🚩 वाघनख 🚩      वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग प्रामुख्याने लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई. मराठा साम्राज्यकाळातील (इ.स. १७०० – इ.स. १८००) वाघनखे, हिगिन्स आर्मरी म्यूझियम, मॅसेच्युसेट्स, अमेरिका. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले? त्याचा वेध आणि शोध घेतला, तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते १८२४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले ...